25 ऑक्टोबर सूर्यग्रहण

  1. Surya Grahan 2022 Date and Timings: 25 ऑक्टोबर दिवशी सूर्यग्रहण; भारतात कधी दिसणार ग्रहण, वेध पाळण्याचा कालावधी काय? घ्या जाणून
  2. Surya Grahan 2022: आज आहे सूर्यग्रहण, पाहताना घ्या अशी काळजी; अन्यथा होऊ शकते नुकसान!
  3. भारतात दुपारी 4 पासून दिसणार, सूर्यास्तानंतर समाप्त; सुतक दिवसभर राहील
  4. Solar Eclipse 2022: दिवाळीला होणार वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण; काय आहे ग्रहण
  5. 25 ऑक्टोबरला खंडग्रास सूर्यग्रहण पाहायला मिळणार; मराठवाड्यातील सर्व शहरांमधून पाहण्याची संधी
  6. Surya Grahan 2022 : घराच्या छतावरून देखील तुम्ही पाहू शकतात सूर्यग्रहण, फॉलो करा
  7. 25 ऑक्टोबर रोजी खंडग्रास सूर्यग्रहण


Download: 25 ऑक्टोबर सूर्यग्रहण
Size: 77.75 MB

Surya Grahan 2022 Date and Timings: 25 ऑक्टोबर दिवशी सूर्यग्रहण; भारतात कधी दिसणार ग्रहण, वेध पाळण्याचा कालावधी काय? घ्या जाणून

भारतामध्ये दिसणारं यंदाच्या वर्षातलं पहिलं सूर्यग्रहण (Surya Grahan) 25 ऑक्टोबर दिवशी आहे. जेव्हा चंद्र हा सूर्य व पृथ्वीच्या मध्ये येतो तेव्हा पृथ्वीवर चंद्राची सावली पडते. या सावलीतून सूर्यग्रहणाची स्थिती निर्माण होते. दिवाळी सणामध्ये यंदाचं खंडग्रास सूर्यग्रहण येणार असल्याने अनेकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. हे खंडग्रास सूर्यग्रहण 25 ऑक्टोबर दिवशी भारतासह आशिया खंडाचा पश्चिम व मध्य भाग, यूरोप आणि आफ्रिका खंडामध्ये पाहता येणार आहे. अवकाशातील घडामोडींचं कौतुक असणार्‍यांना ही पर्वणी असणार आहे कारण हे ग्रहण त्यांना डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहता येणार आहे. मात्र त्यासाठी थोडी काळजी घ्यावी लागणार आहे. प्रसिद्ध पंचांगकर्ते दा कृ सोमण यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत हे ग्रहण संध्याकाळी 4.49 वाजता सुरू होईल. पण ग्रहण संपण्याआधीच संध्याकाळी 6.08 ला सूर्यास्त होणार आहे. त्यामुळे ग्रहणातच सूर्यास्त होताना पहायला मिळणार आहे. सूर्यग्रहणाच्या वेळा पुणे - ग्रहणास सुरूवात (4.51 वाजता) सूर्यास्त (6.31 वाजता) नाशिक - ग्रहणास सुरूवात (4.47 वाजता) सूर्यास्त (6.31 वाजता) नागपूर - ग्रहणास सुरूवात (4.49 वाजता) सूर्यास्त (6.29 वाजता) औरंगाबाद - ग्रहणास सुरूवात (4.49 वाजता) सूर्यास्त (6.30 वाजता) कोल्हापूर - ग्रहणास सुरूवात (4.57 वाजता) सूर्यास्त (6.05 वाजता) सूर्य ग्रहणामध्ये सूतककाळ हा सूर्यग्रहणापूर्वी 12 तास आधी सुरू होतो.होतो. ग्रहणामध्ये वेध हे पहाटे 3.30 पासून संध्याकाळी सूर्यास्तापर्यंत असणार आहेत. लहान मुलं, गर्भवती स्त्रिया, अशक्त व्यक्ती यांच्यासाठी वेध दुपारी 12.30 पासून सुरू होणार आहेत. ग्रहण काळामध्ये अन्न शिजवू नये, जेऊ नये, धार्मिक विधी टाळावेत. देव दर्शन देखील बंद ठेवलं जातंं. अश...

Surya Grahan 2022: आज आहे सूर्यग्रहण, पाहताना घ्या अशी काळजी; अन्यथा होऊ शकते नुकसान!

• • Lifestyle • Surya Grahan 2022: आज आहे सूर्यग्रहण, पाहताना घ्या अशी काळजी; अन्यथा होऊ शकते नुकसान! Surya Grahan 2022: आज आहे सूर्यग्रहण, पाहताना घ्या अशी काळजी; अन्यथा होऊ शकते नुकसान! Surya Grahan 2022: आज 25 ऑक्टोबर रोजी सूर्यग्रहण आहे. खगोल प्रेमींसाठी ही पर्वणीच आहे. हे ग्रहण पाहताना काही काळजी घेणे आवश्यक असते. त्याविषयीच आज आपण जाणून घेणार आहोत. आज आहे सूर्यग्रहण, पाहताना अशी घ्या काळजी; अन्यथा होऊ शकते नुकसान! Surya Grahan 2022: आज सूर्यग्रहण ( solar eclipse 2022) आपणा सर्वांना पाहता येणार आहे. हे या वर्षातील अखेरचे सूर्यग्रहण आहे. ज्यावेळी चंद्र पृथ्वी आणि सूर्याच्या (Sun and moon) मागच्या बाजूने येतो तेव्हा सूर्यग्रहण होते असे वैज्ञानिक सांगतात. 25 ऑक्टोबरच्या सायंकाळी साडे चार ते पाचच्या सुमारास मुंबई (Mumbai), पुण्यासह (Pune) देशभरातील विविध ठिकाणांहून हे ग्रहण पाहता येणार आहे. हे पाहण्यासाठी अनेक जण उत्सुक असतात. मात्र असे करताना काही काळजी घेणे देखील महत्त्वाचे असते. कारण यामुळे आपल्या डोळ्यांना नुकसान होऊ शकते. सूर्यग्रहण पाहताना नेमकी कोणती काळजी घ्यावी याविषयी सविस्तर आज आपण जाणून घेणार आहोत. एक्सरेमधून पाहू नका अनेक लोक एक्स रे फइल्ममधून हे ग्रहण पाहतात. मात्र असे केल्यासही इजा होण्याची शक्यता असते. यामुळे विशिष्ठ चष्मा अवश्य वापरावा. या गोष्टींचा वापर करुन सूर्यग्रहण पाहू नये काही लोक हे साध्या दुर्बिणीमधून सूर्यग्रहण पाहतात. मात्र असे करु नये. तसेच काळ्या काचा, साधे गॉगल, अल्युमिनियम पेपर, कॅमेरा किंवा भिंग यांमधून सूर्य ग्रहण पाहू नका. भारतात किती वाजता पाहता येणार सूर्यग्रहण? मुंबईत सूर्यग्रहण 04:49 पासून ते 06:09 वाजेपर्यंत पाहता येणार आहे. पुण्याम...

भारतात दुपारी 4 पासून दिसणार, सूर्यास्तानंतर समाप्त; सुतक दिवसभर राहील

24 ऑक्टोबर रोजी दिवाळी असेल आणि वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण 25 तारखेला होईल. हे आंशिक ग्रहण असून देशात अनेक ठिकाणी दिसणार आहे. त्यामुळे धार्मिक दृष्टिकोनातूनही ते विशेष असेल. यापूर्वी 30 एप्रिलला सूर्यग्रहण झाले होते, मात्र ते देशात दिसले नव्हते. खगोलशास्त्रज्ञांच्या मते, भारतातून दिसणारे पुढील मोठे सूर्यग्रहण 21 मे 2031 रोजी होणार आहे. जे एक कंकणाकृती ग्रहण असेल. त्याच्या तीन वर्षांनंतर 20 मार्च 2034 रोजी संपूर्ण सूर्यग्रहण भारतातून दिसणार आहे. बिर्ला तारांगण, कोलकाता येथील खगोलशास्त्रज्ञ देवी प्रसाद दुआरी सांगतात की, हे ग्रहण देशाच्या उत्तर आणि पश्चिम भागात अधिक चांगले दिसेल. त्याच वेळी, ते देशाच्या पूर्वेकडील भागात दिसणार नाही कारण त्या ठिकाणी सूर्यास्त झाला असेल. याशिवाय, ही खगोलीय घटना युरोप, उत्तर आफ्रिका, मध्य पूर्व आणि पश्चिम आशियाच्या काही भागांमध्येही दिसेल. श्रीनगर, जम्मू आणि जालंधरमध्ये दिसेल दुपारी 4.30 वाजता हे ग्रहण पुर्णत्वावर असेल. यावेळी ते देशात दिसण्यास सुरुवात होईल. भारतात हे ग्रहण लेह, लडाख, जम्मू, श्रीनगर, उत्तराखंड, पंजाब, दिल्ली, गुजरात, राजस्थान आणि पश्चिम मध्य प्रदेशात दिसणार आहे. यापैकी श्रीनगर, जम्मू, जालंधर, अमृतसर, चंदीगड, डेहराडून, हरिद्वार आणि शिमला येथे ते अधिक स्पष्टपणे दिसेल. तामिळनाडू, कर्नाटक, मुंबई, आंध्र प्रदेश, तेलंगणा, ओडिशा, छत्तीसगड, झारखंड, बंगाल आणि बिहारमध्ये काही काळच पण चांगल्या स्थितीतही दिसणार नाही. त्याचबरोबर आसाम, अरुणाचल, मणिपूर, नागालँडमध्ये हे ग्रहण अजिबात दिसणार नाही. सूर्याचा अर्धा भाग झाकलेला असेल अमावस्येला, सूर्य, चंद्र आणि पृथ्वी जवळजवळ एका रेषेत येतात. ज्याला सूर्यग्रहण म्हणतात. 25 ऑक्टोबरलाही सूर्य, चंद्र आणि प...

Solar Eclipse 2022: दिवाळीला होणार वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण; काय आहे ग्रहण

Solar Eclipse 2022: यंदाच्या वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण (Solar Eclipse) 25 ऑक्टोबर 2022 रोजी होणार आहे. कार्तिक अमावस्येला दिवाळी साजरी केली जाते. अमावस्या तिथीबद्दल बोलायचे झाले तर ती 24-25 ऑक्टोबर या दोन्ही दिवशी राहील. अमावस्या तिथी 24 ऑक्टोबर 2022 रोजी संध्याकाळी 05:27 वाजता सुरू होत आहे जी 25 ऑक्टोबर 2022 रोजी संध्याकाळी 04:18 पर्यंत चालेल. मंगळवार 25 ऑक्टोबर रोजी सूर्यग्रहण होणार आहे. हे ग्रहण आंशिक सूर्यग्रहण आहे जे 2022 चे दुसरे सूर्यग्रहण असेल. हे ग्रहण प्रामुख्याने युरोप, ईशान्य आफ्रिका आणि पश्चिम आशियाच्या काही भागातून दिसणार आहे. भारतात हे ग्रहण नवी दिल्ली, बंगळुरू, कोलकाता, चेन्नई, उज्जैन, वाराणसी, मथुरा येथे दिसणार असून, हे सूर्यग्रहण पूर्व भारत वगळता संपूर्ण भारतात पाहता येणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. (हेही वाचा - या ग्रहणाचा काही राशींवर चांगला तर काही राशींवर चुकीचा प्रभाव पडू शकतो. ग्रहण वेळ काय आहे? सुतक कालावधी किती आहे? ग्रहण काळात कोणती काळजी घ्यावी? याबद्दल जाणून घ्या. सूर्यग्रहण म्हणजे काय? सूर्यग्रहण ही एक भौगोलिक घटना आहे जी सहसा उघड्या डोळ्यांनी पाहिली जात नाही. वास्तविक, पृथ्वीसह अनेक ग्रह सूर्याभोवती फिरतात. चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे आणि तो पृथ्वीच्या कक्षेत फिरत राहतो. पण कधी कधी अशी परिस्थिती असते की चंद्र मध्यभागी आल्याने सूर्याचा प्रकाश थेट पृथ्वीवर पोहोचत नाही. या घटनेला सूर्यग्रहण म्हणतात. आंशिक सूर्यग्रहण म्हणजे काय? मिळालेल्या माहितीनुसार, अमावास्येच्या दिवशी आंशिक सूर्यग्रहण आकारात येते. आंशिक सूर्यग्रहण याला कंकणाकृती सूर्यग्रहण असेही म्हणतात. असे म्हटले जाते की, या ग्रहणादरम्यान सूर्य आणि पृथ्वीमधील अंतर जास्त होते, त्यामुळे ...

25 ऑक्टोबरला खंडग्रास सूर्यग्रहण पाहायला मिळणार; मराठवाड्यातील सर्व शहरांमधून पाहण्याची संधी

काय म्हणाले औंधकर? या विषयी अधिक माहिती देताना औंधकर म्हणाले की, आश्विन अमावास्या मंगळवार 25 ऑक्टोबर रोजी खंडग्रास सूर्यग्रहण दिसणार असून ते भारतासह आशिया खंडाचा पश्चिम व मध्य भाग, संपूर्ण यूरोप आणि आफ्रिका खंडाच्या काही भागातून पहायला मिळणार आहे. हे सूर्यग्रहण ग्रहणचक्र ( सॅरोस ) 124 क्रमांकाचे आहे. हौशी छायाचित्रकारांना ही एक पर्वणीच असेल मराठवाड्यातील शहरांच्या वेळा पाहिल्यास औरंगाबाद येथुन सायंकाळी 4-50 वाजता सूर्यग्रहणास स्पर्श होईल. ग्रहण मध्य सायंकाळी 5-42 वाजता होईल त्यावेळी चंद्रबिंब सूर्यबिंबाचा 36 टक्के भाग झाकून टाकील .पश्चिम आकाशात सुर्यास्तावेळी हे सुंदर दृश्य पाहता येईल. नंतर ग्रहण सुटण्याआधीच सायं. 6-09 वाजता सूर्यास्त होईल. ग्रहणातच सूर्यास्त होताना दिसेल. महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यात ग्रहणातच सूर्यास्त होताना दिसेल. मात्र खगोल व हौशी छायाचित्रकारांना ही एक पर्वणीच असेल. मराठवाड्यातील वेगवेगळ्या ठिकाणांहून वेगवेगळ्या वेळी हे सूर्यग्रहण दिसेल. शहर स्पर्श वेळ मध्य सुर्यास्त औरंगाबाद 4:50 5:42 5:59 जालना 4:49 5:42 5:56 बीड 4:52 5:43 5:57 उस्मानाबाद 4:54 5:44 5:57 परभणी 4:52 5:43 5:53 नांदेड 4:53 5:43 5:51 लातुर 4:54 5:44 5:54 हिंगोली 4:51 5:42 5:51 ग्रहण ग्रसण्याची टक्केवारी ही सर्वात कमी उस्मानाबाद येथे 33 टक्के तर सर्वात जास्त जालना येथे ३७ टक्के असणार आहे. सूर्यग्रहण हे साध्या डोळ्यांनी पाहू नये. पाहिल्यास दृष्टीस इजा होते. सूर्यग्रहण हे ग्रहण चष्म्यातूनच पहावे किंवा चाळणीतून सूर्याची प्रतिमा कागदावर घेऊन त्यामध्ये पहावे. दीपावली सण उत्साहात साजरा होणार या सूर्यग्रहणानंतर 14 दिवसांनी मंगळवारी 8 नोव्हेंबर रोजी होणारे चंद्रग्रहणही भारतातून दिसणार आहे. त्या...

Surya Grahan 2022 : घराच्या छतावरून देखील तुम्ही पाहू शकतात सूर्यग्रहण, फॉलो करा

• • Lifestyle • Surya Grahan 2022 : घराच्या छतावरून देखील तुम्ही पाहू शकतात सूर्यग्रहण, फॉलो करा 'या' टिप्स Surya Grahan 2022 : घराच्या छतावरून देखील तुम्ही पाहू शकतात सूर्यग्रहण, फॉलो करा 'या' टिप्स Suryagrahan 2022: या वर्षाचे सर्वात शेवटचे खंडग्रास सूर्यग्रहण आज म्हणजे 25 ऑक्टोबर रोजी आहे. त्यानुसार घरच्या घरी सूर्यग्रहण बघण्याची सोपी पद्धत जाणून घेऊया. सूर्यग्रहण Surya Grahan 2022 Date and Time: या वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण ( Solar Eclipse 2022) आज म्हणजेच 25 ऑक्टोबर रोजी होत आहे. विशेष म्हणजे हे ग्रहण भारतात (Surya Grahan 2022 date in india) दिसणार आहे. सायंकाळी 4 वाजून 29 मिनिटांला सूर्यग्रहणाला सुरुवात होणार आहे. तर संध्याकाळी 6 वाजून 09 मिनिटांला (Surya Grahan timing) सूर्यग्रहण संपेल. जवळपास दीड तास हे सूर्यग्रहण दिसणार आहे. Also Read: • • • महत्त्वाचा असा हा खगोलीय घटनाक्रम बघण्याची अनेकांना उत्सुकता आहे. मात्र, काही पद्धतींचा वापर करूनच हे सूर्यग्रहण चांगल्या प्रकारे बघता आणि अनुभवता येते. तुम्हालाही सूर्यग्रहण बघण्याची उत्सुकता लागलीच असेल तर काळजी करू नका. आम्ही तुम्हाला घरच्या घरी सूर्यग्रहण बघण्याची सोपी पद्धत सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया काय आहे ती पद्धत…. ऐन दिवाळीत आलेले यंदाचे हे सूर्यग्रहण सायंकाळी 4 वाजून 29 मिनिट ते संध्याकाळी 6 वाजून 09 मिनिटांदरम्यान बघता येणार आहे. तत्पूर्वी 12 तास आधी सुतक काळ सुरू झाला आहे. हा सुतक कालावधी मंगळवारी म्हणजे 25 ऑक्टोबर रोजी पहाटे 4 वाजेपासून सुरु झाला आहे. सूर्यग्रहणाबाबत समाजात अनेक समज-गैरसमज आहे. मात्र, या गैरसमजूतींना वैज्ञानिकदृष्ट्या कुठलाही आधार नाही. त्यामुळे गैरसमज दूर ठेवत तुम्ही सूर्यग्रहणाच्या आन...

25 ऑक्टोबर रोजी खंडग्रास सूर्यग्रहण

नवी दिल्ली (सौजन्य: पीआयबी): 25 ऑक्टोबर रोजी खंडग्रास सूर्यग्रहण होणार असून भारतात या ग्रहणाची सुरुवात सूर्यास्तापूर्वी दुपारच्या वेळेत होणार आहे. हे ग्रहण भारतातील बहुतांश ठिकाणांहून पाहता येईल. मात्र, अंदमान आणि निकोबार बेटे तसेच ईशान्य भारतातील ऐझवाल, दिब्रुगड, इम्फाळ, इटानगर,कोहिमा,शिवसागर,सिलचर,तमेलाँग इत्यादी काही ठिकाणी हे ग्रहण दिसणार नाही. ग्रहणाचा मोक्ष भारतातील सूर्यास्ताच्या वेळेनंतर होणार असल्याने भारतातून ग्रहणाचा मोक्ष दिसणार नाही. देशाच्या ईशान्य भागातून पाहताना ग्रहण मध्यकाळात चंद्राच्या सावलीने सूर्यबिंबाचा सुमारे 40 ते 50 टक्के भाग व्यापलेला दिसेल. देशाच्या इतर भागांमध्ये यापेक्षा कमी प्रमाणात सूर्यबिंब व्यापलेले दिसेल. दिल्ली आणि मुंबई या शहरांचा विचार करता ग्रहणाच्या मध्य काळात चंद्राने सूर्यबिंबाचा अनुक्रमे 44 टक्के आणि 24 टक्के भाग व्यापलेला दिसेल. या दोन्ही शहरांमध्ये ग्रहणाच्या स्पर्श काळापासून सूर्यास्तापर्यंत ग्रहणाचा कालावधी अनुक्रमे 1 तास 13 मिनिटे आणि 1 तास 19 मिनिटे असेल. चेन्नई आणि कोलकाता या शहरांसाठी बिंब स्पर्शापासून सूर्यास्तापर्यंतचा कालावधी अनुक्रमे 31 मिनिटे आणि 12 मिनिटे असेल. हे खंडग्रास ग्रहण युरोप, मध्य-पूर्व, आफ्रिकेचा ईशान्य भाग, पश्चिम आशिया, अटलांटिक महासागराचा उत्तर भाग आणि हिंदी महासागराच्या उत्तर भागातून दिसेल. यानंतरचे भारतातून दिसू शकणारे सूर्यग्रहण 2 ऑगस्ट 2027 रोजी होणार आहे. ते खग्रास सूर्यग्रहण असेल. मात्र, देशाच्या सगळ्या भागांतून हे खंडग्रास स्वरूपाचे सूर्यग्रहण म्हणून पाहता येईल. सूर्यग्रहण म्हणजे काय? अमावास्येच्या दिवशी जेव्हा सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एका रेषेत येतात आणि पृथ्वी व सूर्याच्या मध्ये चंद्र येतो तेव्हा...