Beed lokmat

  1. घरात शिरली वाईट शक्ती, शिक्षिकेनं भोंदूबाबाला बोलावलं अन् त्याने 14 तोळे सोन्याचा केला 'कोळसा'
  2. वाशिमची नवरी, परळीचा नवरदेव; बालविवाह लागला अंबाजोगाईत
  3. Beed News : भोंदूबाबांनी शिक्षिकेलाच लावला चुना! घरातील वाईट शक्ती काढण्याच्या नादात घडलं भयंकर


Download: Beed lokmat
Size: 4.61 MB

घरात शिरली वाईट शक्ती, शिक्षिकेनं भोंदूबाबाला बोलावलं अन् त्याने 14 तोळे सोन्याचा केला 'कोळसा'

सुरेश जाधव, प्रतिनिधी बीड, 14 जून : आत्तापर्यंत आपण अशिक्षित अज्ञानी लोकांना भोंदू बाबांनी गंडा घातल्याचं पाहिलं असेल मात्र बीडमध्ये चक्क शिक्षकेलाच घरातील वाईट शक्ती बाहेर काढण्यासाठी सुवर्ण कलश पुजा करायला लावली. पण 2 भामट्यांनी कलशातील तब्बल 14 तोळे सोने लांबवल्याचा धक्कादायक प्रकार बीडमध्ये उघडकीस आला आहे. यावरून सुशिक्षितांना फसवणारे भोंदूंची टोळी नवीन मोडस ऑपरेटिव वापरत असल्याचा अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सदस्यांनी सांगितले आहे. अंधश्रद्धेच्या नादाला लागून भोंदू बाबांच्या जाळ्यात अशिक्षित गरीब पीडित लोक असल्यास अनेक प्रकरण आपण पाहिले असतील. मात्र बीडमध्ये एका चक्क शिक्षकेलाच भोंदूंनी जाळ्यात ओढलं आणि घरामध्ये वाईट शक्ती आहे, त्यामुळेच दुखणे मागे लागले आहे. त्यामुळे ती वाईट शक्ती बाहेर काढण्यासाठी घरात सुवर्ण कलश पूजा करावी लागेल असे सांगून घरात प्रवेश केला. घरातील सर्व सोन्याचे दागिने एका कलशमध्ये ठेवण्यास सांगितले. त्यानंतर घरातील सर्वांना बाहेर पाठवून दिले आणि सोनं असलेल्या कलशच्या ऐवजी दुसराच एक कलश त्याठिकाणी ठेवला. त्यानंतर हा कलश त्या कुटुंबीयांच्या हाती देत 12 ते 13 वर्ष हा कलश उघडू नका अन्यथा अनर्थ होईल, असंही सांगितलं. मात्र या कुटुंबीयांना संशय आल्याने त्यांनी कलश उघडून पाहिले असता त्यामध्ये सोन्याचे दागिन्याऐवजी कोळसा आढळून आला. • भरधाव कारवरचं कंट्रोल सुटलं, झाडावर आदळली अन् जागीच 2 डॉक्टरांचा गेला जीव • Beed News: महाराष्ट्रातलं असं मंदिर जे नदीपात्रात आहे उभं, पूर आल्यावर काय होतं? पाहा हा VIDEO • Beed News : 'पैसे देईपर्यंत तुमची मुलं आमच्याकडे ठेवा' ऊसतोड मजुरांच्या 6 मुलांसोबत धक्कादायक कृत्य • Child marriage : एकाच मुलीचा तीन वेळा लावला बालविवाह;...

वाशिमची नवरी, परळीचा नवरदेव; बालविवाह लागला अंबाजोगाईत

भीमराव इंगोले (रा. उकळीपेन, ता. जि. वाशिम) यांच्या अल्पवयीन मुलीचा विवाह परळी तालुक्यातील मोहा येथील गौतम तातेराव शिंदे याच्यासोबत होता. ९ जूनला सकाळी ११:२० चा मुहूर्त असतानाच काही लोकांनी बालविकास कार्यालयाला याची माहिती दिली. त्यानंतर येथील सर्व कर्मचारी व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अंबाजोगाई शहरातील परळी वेस भागात हा विवाह झाल्याची खात्री पटताच मुलीचे वडील, मुलाचे वडील, आजोबा, आदी लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

Beed News : भोंदूबाबांनी शिक्षिकेलाच लावला चुना! घरातील वाईट शक्ती काढण्याच्या नादात घडलं भयंकर

सुरेश जाधव, प्रतिनिधी बीड : राज्यात आजही अनेक ठिकाणी भोंदूबाबांवर अगदी सहज विश्वास ठेवला जातो. यामुळे मोठं नुकसान होतं, याबाबत गावागावात आवाहन करुनही बऱ्यावेळा लोकांना ते पटत नाही आणि अनर्थ घडतात. असाच एक धक्कादायक प्रकार बीडमधून समोर आला आणि परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. सुशिक्षित असूनही अंधश्रद्धेच्या बळी पडलेल्या शिक्षिकेला एका भामट्याने लुटलं आणि तिच्यावर पश्चाताप करण्याची वेळ आली आहे. या प्रकरणी महिलेनं महिलेनं पोलिसात न्याय मागण्यासाठी धाव घेतली आहे. घरातील वाईट शक्ती बाहेर काढण्यासाठी सुवर्ण कलश पुजा करायला लावत दोन भामट्यांनी कलशातील तब्बल १४ तोळे सोने लांबवल्याचा धक्कादायक प्रकार बीडमध्ये उघडकीस आला. या प्रकरणी शिक्षीकेच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दोघांविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. घरामध्ये वाईट शक्ती आहे, त्यामुळेच दुखणे मागे लागले आहे असं या महिलेच्या मनावर बिंबवण्यात आलं. त्यामुळे ती वाईट शक्ती बाहेर काढण्यासाठी घरात सुवर्ण कलश पूजा करावी लागेल असे सांगत या भामट्यांनी घरात प्रवेश केला. घरातील सर्व सोन्याचे दागिने एका कलशमध्ये ठेवण्यास सांगितले. त्यानंतर घरातील सर्वांना बाहेर पाठवून दिले आणि सोने असलेल्या कलशच्या ऐवजी दुसराच एक कलश त्याठिकाणी ठेवला. त्यानंतर हा कलश त्या कुटुंबियांच्या हाती देत १२ ते १३ वर्ष हा कलश उघडू नका अन्यथा अनर्थ होईल असेही सांगितले. कुटुंबियांना संशय आल्याने त्यांनी कलश उघडून पाहिले असता त्यामध्ये सोन्याचे दागिन्याऐवजी कोळसा आढळून आला. त्यामुळे फसवणूक झाल्याचं लक्षात आलं. अखेर पीडित संजीवनी हनुमंतराव मेडकर यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांच्या फिर्यादीवरून राजेंद्र लोटके, मिना लोटके या दोघांविरुध्द कलम ४२०, ४०६, ४९८ भादवी प...