दिंडोरी प्रणित स्वामी चरित्र

  1. दिंडोरीचे खंडेराव आप्पाजी उर्फ मोरेदादा (सन १९२२
  2. श्री स्वामी समर्थांच्या नामजप यज्ञाची सांगता; भुसावळात नंदनवन कॉलनीत आयोजित कार्यक्रमात भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती
  3. स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त महाप्रसादाचा लाभ; अखंड स्वामीनाम जप, सामूहिक गुरुचरित्र पारायण, गणेश याग आदी कार्यक्रमांची रेलचेल
  4. ॥ श्री स्वामी समर्थ ॥: दिंडोरी प्रणित प्रकाशणे


Download: दिंडोरी प्रणित स्वामी चरित्र
Size: 20.56 MB

दिंडोरीचे खंडेराव आप्पाजी उर्फ मोरेदादा (सन १९२२

जन्म: १९२२ कार्यकाळ: १९२२-१९८८ गुरु: पिठले महाराज समाधी: १९८८ दिंडोरी येथे तेजोनिधी दिंडोरीचे खंडेराव आप्पाजी उर्फ मोरेदादा सद्गुरू प.पू. मोरेदादांनी पूर्ण आयुष्याचा प्रत्येक क्षण परब्रम्ह भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांचे मूळ तत्व सर्वसामान्यांना कोणताच भेदभाव न करता अत्यंत सोप्या पद्धतीने समजावून सांगण्यात व्यतीत केला आहे. सद्गुरू प.पू.दादांनी १९७८ पर्यंत छत्रपती शिवरायांप्रमाणे निष्ठावान माणसे घडविली व परमात्म्याचे कार्य करण्याची योजना राबविली. १९७८ पासून पुढे महाराजांच्या आशीर्वादाने या गुरुप्रणीत मार्गासाठी वेगवान घोडदौड करून मानवी आवाक्याबाहेरचे कार्य उभे केले. सद्गुरू प.पू. मोरेदादा यांनी सेवामार्गात कुणाचेही गुरुपद न घेता थेट “श्री स्वामी समर्थ” महाराजांनाच गुरु करण्याची प्रथा रूढ केली. ही दादांच्या नीरअहंकाराची परमोच्च साक्ष आहे. सेवामार्गात मार्गदर्शन विनामुल्य ठेवल्यामुळे व संबधित वाङमयही माफक दरात ठेवल्यामुळे तळागाळातील लोकही सेवामार्गाचा लाभ मिळवू लागले. सर्व साहित्य व ज्ञानाच्या बाबतीत कोणतीही गोपनीयता न ठेवता पुढील पिढीसाठी सहज उपलब्ध करून ठेवल्यामुळे मार्गाच्या वाढत्या प्रचारासाठी त्यांच्या महानिर्वाणानंतरही अनेक सेवेकरी या कार्यासाठी क्रियाशील होवू लागले. तथाकथित धर्ममार्तंडांनी महिला वर्गास हजारो वर्षे अध्यात्मिक ग्रंथ व ज्ञानपासून वंचित ठेवले. त्या महिलांनाच सद्गुरू मोरेदादांनी प्रचार-प्रसाराचे आधारस्तंभ बनविले. “श्रीगुरुचरित्रा” सारख्या वेद्तुल्य ग्रंथाचे पारायणे करण्यास महिलांना असलेली बंदी दादांनी दूर केली. पुणे येथील सारसबागेशेजारी स्वामी समर्थांचा एक मठ आहे. त्याच्याशी संबंधीत असलेले मोरेदादा सर्वांच्या परिचयाचे आहेत. यांचे नाव खंडेराव आप्पाजी उर्फ...

श्री स्वामी समर्थांच्या नामजप यज्ञाची सांगता; भुसावळात नंदनवन कॉलनीत आयोजित कार्यक्रमात भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती

चैत्र कृ.६ ते कृ.१३ या कालावधीत सर्वत्र श्री स्वामी पुण्यतिथीनिमित्त उत्सव भक्तिमय वातावरणात साजरा केला जातो. त्याप्रमाणे श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक सेवा केंद्र व बालसंस्कार केंद्र (दिंडोरी प्रणित) नंदनवन कॉलनी भुसावळ, येथेही अखंड नामजप यज्ञ सप्ताहाचे आयोजन केले होते. या सप्ताह काळात श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र (दिंडोरी प्रणित) शहर व ग्रामीण भागातील शेकडो सेवेकऱ्यांनी विविध सेवा श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त ऑनलाइन व प्रत्यक्ष केल्या. त्यात प्रामुख्याने अखंडपणे सप्ताह कालावधीत विविध सेवा दिल्यात. अखंड प्रहर सेवा, श्री गुरुचरित्र पारायण - केंद्रात ५२ पारायणे झाली. तर ऑनलाईन स्वरुपात घरी गुरुचरित्र पारायण १५० भाविकांनी केले. श्री स्वामी समर्थ मंत्र जप करण्यात आला. नवार्णव मंत्र जप, गायत्री मंत्राचे १८ हजार ५७६ मंत्र जप, महामृत्युंजय मंत्राचे १४ हजार ६५ मंत्र जप, श्री स्वामी चरित्र सारामृत १४७ पाठ, श्री दुर्गा सप्तशती पारायण २५५ पाठ भावकांनी केले. अशा प्रकारच्या विविध सेवा अखंडपणे भाविक भक्तांनी या सप्ताहात भक्तिमय वातावरणात श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नाम जप यज्ञाचा जयघोष करीत सांगता झाली. यावेळी भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होती.

स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त महाप्रसादाचा लाभ; अखंड स्वामीनाम जप, सामूहिक गुरुचरित्र पारायण, गणेश याग आदी कार्यक्रमांची रेलचेल

शहरातील दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी निमित्त गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे व चंद्रकांत दादा यांच्या आदेशाने अखंड स्वामीनाम जप यज्ञ सप्ताह व सामूहिक गुरुचरित्र पारायण सोहळा संपन्न झाला. या सप्ताह काळात नवनाथ पारायण, अखंड स्वामीनाम जप, अखंड दोन विना वादन, अखंड दोन स्वामी चरित्र पठणासह गणेश याग, मनोबोध याग, गीताई याग, चंडी याग, स्वामी याग, रुद्र याग, मल्हारी याग, तसेच रोज नित्यस्वहाकार व त्रिकाल आरतीसह सायंकाळी टाळमृदुंगाच्या गजरात औदुंबर प्रदक्षिणा व विष्णुसहस्त्रनाम, गिताई, मनाचेश्लोक, पसायदान, तुकाराम अभंग आदी धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी भाविकांची मोठी उपस्थिती होती. गुरुवारी सकाळी महानैवेद्य व महाआरती नंतर आयोजित महाप्रसाद वाटप करण्यात आला. पंचक्रोशीतील भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

॥ श्री स्वामी समर्थ ॥: दिंडोरी प्रणित प्रकाशणे

(मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती,तेलगु, व कन्नड) श्री स्वामी चरित्र सारामृत- श्री स्वामी चरित्रसारामृत हा ग्रंथ श्री स्वामी सेवा मार्गातील नित्य उपासनेचा अतिशय महत्त्वपुर्ण ग्रंथ आहे. या अमृततुल्य ग्रंथात भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांचा अद्भूत लीलांपैकी काही लीलांचा समावेश यात केला आहे. या ग्रंथाचे १०८ पारायणे केल्यास मनातील सर्व इच्छा पुर्ण होवून महाराजांचा कृपाशिर्वाद प्राप्त होतो. या ग्रंथांचे एकुण २१ अध्याय असून प्रत्येक सेवेकर्‍याने दररोज नित्य सेवेत या ग्रंथांचे क्रमशः तीन अध्याय किंवा एक अध्याय तरी रोज दिवसभरातून केव्हाही वाचन करावा. (मराठी, संस्कृत,गुजराती, हिंदी व कन्नड) नित्यसेवा, स्तोत्र व मंत्र या ग्रंथामध्ये प्रत्येक भाविक व सेवेकर्‍याने दररोज करावयाची सेवा तसेच विशेष प्रसंगी करावयाची विशेष सेवा सविस्तर दिलेली आहे. त्यात विार्थांपासून तरुण ते वृद्धव्यक्तींनी करावयाची सेवा-स्तोत्र, मंत्र, सुक्त, अथर्वशीर्ष तसेच निरनिराळ्या देवतांची विशेष सेवाही या ग्रंथात दिलेली आहे. तसेच विविध देव देवतांच्या आरत्या व त्यांची करावयाची उपासना या ग्रंथात समाविष्ट करण्यात आली आहे. (मराठी,संस्कृत, हिंदी, गुजराती व कन्नड) श्री दुर्गा सप्तशती हा ग्रंथ प्रत्यक्ष माता भगवतीने नाशिक जिल्ह्यामधील सप्तश्रृंगी गडावरती मार्कंडेय ऋषींना सांगितला आहे. हा ग्रंथ ७०० ओव्यांमध्ये असल्याने सप्तश्रृंग हे नाव पडले. या ग्रंथाचे सद्गुरू प.पू. मोरेदादांनी हा अतिशय शक्तिशाली ग्रंथ दिंडोरी दरबार येथे प्रकाशित करून लाखो भक्तांना भगवतीची अतिउध सेवा उपलब्ध करून दिली. या ग्रंथाच्या पाठामुळे (वाचनामुळे) सर्व प्रकारच्या समस्या विशेष करून विवाह समस्या, संतती विषयक समस्या, वास्तुविषयक समस्यांचे निवारण होते. या...