Esakal nashik

  1. Nashik: डॉ. मंगरूळे उपजिल्हा निवडणूक अधिकारी; नाशिक विभागात उपजिल्हाधिकारी व तहसीलदारांच्या बदल्या
  2. Nashik News: शेतीमालाला भाव द्या, नाहीतर गोळ्या झाडा! मुंजवाड येथील तरुण शेतकऱ्यांचे पंतप्रधानांना पत्र


Download: Esakal nashik
Size: 46.68 MB

Nashik: डॉ. मंगरूळे उपजिल्हा निवडणूक अधिकारी; नाशिक विभागात उपजिल्हाधिकारी व तहसीलदारांच्या बदल्या

Nashik News : नाशिक विभागातच संगमनेर येथे उपविभागीय अधिकारीम्हणून कार्यरत उपजिल्हा डॉ. शशिकांत मंगरूळे यांची नाशिक जिल्ह्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारीम्हणून नियुक्ती झाली आहे. नाशिक विभागातील उपजिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्या बदलीचे काल (ता.१२) आदेश काढण्यात आले आहेत. महसूल व वन विभागाचे सहसचिव डॉ. माधव वीर यांनी हे बदली आदेश काढले आहेत. (Dr Mangarule Upazila Election Officer Transfers of Deputy Collectors and Tehsildars in Nashik Division) नंदुरबार येथील जिल्हा पुनर्वसन अधिकारी पदावर कार्यरत असलेले नितीन सदगीर यांची मालेगावच्या प्रांताधिकारीपदी बदली झाली आहे. महसूल विभागातील उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या विनंती बदल्यांमध्ये श्री. सदगीर यांच्या बदलीचा समावेश आहे. येथील प्रांताधिकारी विजयानंद शर्मा यांची बदली प्रस्तावित असताना श्री. सदगीर यांची नियुक्ती झाली आहे. श्री. शर्मा यांना अद्याप नियुक्ती मिळालेली नाही. मालेगाव उपविभागाचे नूतन प्रांताधिकारी म्हणून श्री. सदगीर कामकाज पाहतील. १५ जूनपूर्वी रुजू होण्याचे आदेश त्यांना देण्यात आले आहेत. श्री. सद्‌गीर यांच्यासह कुंदनकुमार सोनवणे यांची सहाय्यक आयुक्त नाशिक नियुक्ती झाली आहे. नाशिकलाच ते भुसुधार सहाय्यक आयुक्त म्हणून कामकाज पाहत होते. संगमनेरचे उपविभागीय अधिकारी डॉ.शशिकांत मंगरूळे यांची उपजिल्हा निवडणूक अधिकारी नाशिक येथे बदली झाली आहे. तर या पदावर पूर्वी कार्यरत असलेल्या स्वाती थविल यांची उपजिल्हाधिकारी पाटबंधारे क्रमांक १ नाशिक तर संजय बागडे यांची सचिव नंदुरबार या पदावर बदली झाली आहे. हेही वाचा : यापूर्वी श्री. बागडे नंदुरबार येथे उपजिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून कार्यरत होते. याशिवाय राज्यातील नितीन गावंडे, विठ्...

Nashik News: शेतीमालाला भाव द्या, नाहीतर गोळ्या झाडा! मुंजवाड येथील तरुण शेतकऱ्यांचे पंतप्रधानांना पत्र

Nashik News : शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव द्यावा, शेतकऱ्यांच्या मुलांना शैक्षणिक पात्रतेप्रमाणे नोकरी द्यावी, नोकरी देणे शक्य नसल्यास तितके मानधन मिळावे आणि जर या चारही बाबी देणे शक्य नसेल तर बंदुकीच्या गोळ्या झाडून आमचे कष्टमय जीवन संपवून आम्हाला मुक्ती द्यावी. अशी आर्त मागणी मुंजवाड (ता. बागलाण) येथील शेकडो शेतकरी संघटना, सुशिक्षित बेरोजगार युवकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शैक्षणिक पात्रतेच्या प्रती व अर्ज पाठवून केली आहे. ही मोहीम राज्यभर राबविणार असल्याचा इशारा शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष केशव सूर्यवंशी यांनी दिला. (Give price to agricultural products otherwise shoot letter from young farmers of Munjwad to PM modi Nashik News ) हेही वाचा : मुंजवाड येथील महादेव मंदिराच्या सभागृहात सोमवारी (ता.१२) सकाळी गावातील तरुण शेतकरी युवकांचा मेळावा झाला. देशातील प्रत्येक सुशिक्षित शेतकऱ्याने पंतप्रधानांना वैयक्तिक पत्र पाठवून ही मोहीम राबवावी असा ठराव मुंजवाड शेतकरी संघटनेचे महेंद्र जाधव यांनी मांडला. यावेळी गावातील सर्व तरुण शेतकरी बेरोजगार युवक, शेतकरी संघटनेचे माणिक निकम, मोरेनगरचे उपसरपंच व्यंगचित्रकार किरण मोरे, भास्कर बागूल, नयन सोनवणे व मुंजवाड परिसरातील शेकडो तरुण शेतकरी उपस्थित होते.