गुरूचरित्र अध्याय 14 pdf

  1. गुरूचरित्र/अध्याय अठरावा


Download: गुरूचरित्र अध्याय 14 pdf
Size: 56.46 MB

गुरूचरित्र/अध्याय अठरावा

690 गुरूचरित्र/अध्याय अठरावा १५ वे - १६ वे शतक श्रीगणेशाय नमः । श्रीसरस्वत्यै नमः । श्रीगुरुभ्यो नमः । जय जया सिद्धमुनि । तू तारक भवार्णी । सुधारस आमुचे श्रवणी । पूर्ण केला दातारा ॥१॥ गुरुचरित्र कामधेनु । ऐकता न-धाये माझे मन । कांक्षीत होते अंतःकरण । कथामृत ऐकावया ॥२॥ ध्यान लागले श्रीगुरुचरणी । तृप्ति नव्हे अंतःकरणी । कथामृत संजीवनी । आणिक निरोपावे दातारा ॥३॥ येणेपरी सिद्धासी । विनवी शिष्य भक्तीसी । माथा लावूनि चरणांसी । कृपा भाकी तये वेळी ॥४॥ शिष्यवचन ऐकोनि । संतोषला सिद्धमुनि । सांगतसे विस्तारोनि । ऐका श्रोते एकचित्ते ॥५॥ ऐक शिष्या शिकामणी । धन्य धन्य तुझी वाणी । तुझी भक्ति श्रीगुरुचरणी । तल्लीन झाली परियेसा ॥६॥ तुजकरिता आम्हांसी । चेतन जाहले परियेसीं । गुरुचरित्र आद्यंतेसी । स्मरण जाहले अवधारी ॥७॥ भिल्लवडी स्थानमहिमा । निरोपिला अनुपमा । पुढील चरित्र उत्तमा । सांगेन ऐका एकचित्तें ॥८॥ क्वचित्काळ तये स्थानी । श्रीगुरु होते गौप्येनि । प्रकट जहाले म्हणोनि । पुढे निघाले परियेसा ॥९॥ वरुणासंगम असे ख्यात । दक्षिणवाराणसी म्हणत । श्रीगुरु आले अवलोकित । भक्तानुग्रह करावया ॥१०॥ पुढें कृष्णातटाकांत । श्रीगुरू तीर्थे पावन करीत । पंचगंगगासंगम ख्यात । तेथें राहिले द्वादशाब्दे ॥११॥ अनुपम्य तीर्थ मनोहर । जैसें अविमुक्त काशीपुर । प्रयागसमान तीर्थ थोर । म्हणोनि राहिले परियेसा ॥१२॥ कुरवपुर ग्राम गहन । कुरूक्षेत्र तोंचि जाण । पंचगंगासंगम कृष्णा । अत्योत्त्म परियेसा ॥१३॥ कुरुक्षेत्रीं जितके पुण्य । तयाहूनि अधिक असे जाण । तीर्थे अस्ती अगण्य़ । म्हणोनि राहिले श्रीगुरू ॥१४॥ पंचगंगानदीतीर । प्रख्यात असे पुराणांतर । पांच नामे आहेति थोर । सांगेन ऐका एकचित्तें ॥१५॥ शिवा भद्रा भोगावती । कुंभीनदी सरस्...