हरिपाठ

  1. संत नामदेव हरिपाठ
  2. स्तोत्रे, श्लोक, प्रार्थना यांचा संग्रह
  3. संत ज्ञानेश्वर महाराज सार्थ हरिपाठ
  4. हरिपाठ
  5. Haripath lyrics in Marathi


Download: हरिपाठ
Size: 8.74 MB

संत नामदेव हरिपाठ

संत नामदेव हरिपाठ – १ नामाचा महिमा कॊण करी सीमा । जपावॆं श्रीरामा ऎका भावॆं ।। १।। न लगती स्तॊत्रॆं नाना मंत्रॆं यंत्रॆं । वर्णिजॆ बा वक्त्रॆं श्रीरामनाम ।। २।। अनंत पुण्यराशी घडॆ ज्या प्राण्यासी । तरीच मुखासी नाम यॆत ।। ३।। नामा म्हणॆं नाम महाजप परम । तॊ दॆह उत्तम मृत्युलॊकीं ।। ४।। संत नामदेव हरिपाठ – २ जन्माचॆं कारण रामनामपाठीं । जाइजॆ वैकुंठीं ऎकीहॆळा ।। १।। रामनाम ऐसा जिव्हॆ उमटॆ ठसा । तॊ उद्धरॆल आपैसा इहलॊकीं ।। २।। दॊ अक्षरीं राम जप हा परम । नलगॆ तुज नॆम नाना पंथ ।। ३।। नामा म्हणॆ पवित्र श्रीरामचरित्र । उद्धरितॆ गॊत्र पूर्वजॆंसी ।। ४।। संत नामदेव हरिपाठ – ३ विषयांचॆ कॊड कां करिसी गॊड । हॊईल तुज जॊड इंद्रियबाधा ।। १।। सर्वही लटिकॆं जाण तूं बा निकॆं । रामाविण ऎकॆं न सुटिजॆ ।। २।। मायाजाळ मॊहॆं इंद्रियांचा रॊहॊ । परि न धरॆचि भावॊ भजनपंथॆं ।। ३।। नामा म्हणॆ दॆवा करीं तूं लावलाही । मयूराचा टाहॊ घनगर्जना ।। ४।। संत नामदेव हरिपाठ – ४ कांसवीचॆ दृष्टी जैं यॆईज्ऎ भॆटी । तैं अमृताची सृष्टी घडॆ त्यासी ।। १।। तैसॆं हॆं भजन श्रीरामाचॆं ध्यान । वाचॆ नारायण अमृतमय ।। २।। धन्य त्याचॆं कुळ सदा पैं सुफळ । दिननिशीं पळ रामनाम ।। ३।। नामा म्हणॆ चॊखट भक्त तॊ उत्तम । वाचॆसी सुगम रामनाम ।। ४।। संत नामदेव हरिपाठ – ५ सदा फळ सुफळ वाचॆसी गॊपाळ । वंदी कळिकाळ शास्त्र सांगॆ ।। १।। ब्रह्मांडनायक ऐसॆं जॆं कौतुक । तॆंचि नाम ऎक श्रीकृष्ण ऐसॆं ।। २।। आदि अंत पाहतां नाहीं पैं सर्वथा । परिपूर्ण सरिता अमृताची ।। ३।। नामा म्हणॆ अनंत कां करिशी संकॆत । उद्धरिलॆ पतित युगायुगीं ।। ४।। ६ गॊविंद गॊपाळ वाचॆसी निखळ । तॊ उद्धरॆ तात्काळ कलीमाजी ।। १।। नारायण नारायण हॆंचि पारायण । उद्धरलॆ जन इहलॊकीं ।। २।। तुटती यातन...

स्तोत्रे, श्लोक, प्रार्थना यांचा संग्रह

नमस्कार, लहानपणी शुभंकरोती म्हणताना आपण काही काही स्तोत्रे, श्लोक म्हणत असू. आपल्या ऋषी-मुनींनी तपसाधना करुन अनेक स्तोत्रे, स्तवने सिद्ध केली आहेत. त्यातील काही आपल्या नित्य पठणात असतात तर काही तात्कालीक कारणासाठी उपासना म्हणून म्हटली जातात. ह्या स्तोत्रांमधे बीजमंत्र सामावलेले असतात व त्यांचे जमेल तसे पठण निश्चितच सकारात्मक बदल घडवून आणते, आपल्या विचारात, प्रारब्धात. विचार सात्विक व्ह्यायला लागले की हातून चूका कमी कमी घडू लागतात, मन (जे आपले प्रारब्ध घडवते) आपल्या ताब्यात येऊ लागते. सगळ्यात ओढाळ मनासारखे काहीच नाही. आजच्या पिढीला व पुढच्या मोठे होऊ घातलेल्या पिढीला मनावर ताबा मिळवण्याची खूप गरज आहे. पुढची पिढी दहशतवादी विचारांची बनायला नको आहे. प्रकाशाचे उपासक हे शुद्ध दैवतांचीच उपासना करतात ज्यामधे स्वतःचे, कुटुंबाचे, समाजाचे, प्रदेशाचे भले व्हावे, रक्षण व्हावे हा हेतू असतो तर अंधाराचे उपासक हे क्षुद्र दैवतांची उग्र प्रकारे उपासना करतात ज्यामधे दुसर्‍याचे वाईट व्हावे हाच मुख्य हेतू असतो, तंत्रविद्येचा, जारण मारणाचा वापर असतो. इथे शुद्ध दैवतांच्या उपासनांमधे समावेश होऊ शकणार्‍या स्तोत्रं, श्लोक, प्रार्थना शक्य असल्यास कारण व फलितासह लिहिणे अपेक्षित आहे (मायबोलीवर दुसर्‍या प्रकारचे सदस्य असूच शकत नाहीत म्हणा ) जेणेकरुन मायबोलीवर एकेच ठिकाणी सगळे मिळू शकेल, गूगलवर शोधत बसायची आवश्यकता नाही. स्तोत्र, अध्याय, श्लोक मोठे असतील तर लिंकही देण्यास हरकत नाही (अ‍ॅडमिनची हरकत असल्यास तसे कृपया कळवावे व त्यांच्या आदेशानुसार लिंका देऊ नयेत.) सर्वांना धन्यवाद आतापर्यंत खालील स्तोत्रे इ. जमा झाली आहेत. जसजशी भर पडेल तसतशी यादी अपडेट करायचा प्रयास करेन. **********************************...

संत ज्ञानेश्वर महाराज सार्थ हरिपाठ

भावार्थ : नामस्मरण आणि संकीर्तन ही वैष्णवांची जोडी होय. यामुळे त्यांची अनंत कोटी पापे लयाला जातात. अनंत जन्मांचे तप एका हरिनामाच्या बरोबरीचे आहे. ईश्वरप्राप्तीच्या सर्व साधनमार्गांत हरिपाठ सवांत सोपा मार्ग आहे. योग, यज्ञ, क्रिया, धर्म, अधर्म ही सर्व माणसाला प्रपंचात गुंतवणारी माया आहे. हरिपाठाने तिचा नाश होतो. श्री ज्ञानदेवमहाराज म्हणतात, माझे यज्ञ, योग, क्रिया, धर्म, सर्व काही हरीच आहे. हरिनामावाचून मला दुसरा नेम नाही. विवरण : भागवत धर्माचे निष्काम बुद्धीने आचरण करून विष्णूची नि:सीम उपासना करणाऱ्यास वैष्णव म्हणतात. वैष्णवांच्या दृष्टीने नाम- संकीर्तन जोडी महत्त्वाची आहे. हरि नामस्मरण व संकीर्तन. संकीर्तन म्हणजे भगवंतांच्या लीलांचे श्रवण करणे व त्यांचे स्वतः वर्णन करणे. याखेरीज सर्व प्रकारची कायिक, वाचिक व मानसिक कर्मे भगवत्प्राप्तीसाठी करून ती भगवंतांनाच अर्पण करणे हाही भागवत धर्मच होय. भागवत धर्माचे | आजन्म अनुष्ठान करणारा वैष्णव म्हटला जातो. श्री गुलाबराव महाराजांनी "वैष्णव बोलिले नामस्मरणीं। रामकृष्णीं उच्चारु॥ ६११॥ (संप्रदाय सुरतरु अ. २) असे वैष्णवांचे लक्षण सांगितले आहे; तर श्री तुकाराममहाराज म्हणतात, भावार्थ : नारायणनामाचा जप हेच सर्व साधनांचे सार आहे, याला वेद, शास्त्र, उपनिषदे प्रमाण आहेत. भगवत्प्रेमाशिवाय केलेले जप, तप, कर्म, नेम, धर्म इत्यादी सर्व हे व्यर्थ श्रम आहेत. मधाच्या लोभाने व कळीत अडकलेला भुंगा तेथून बाहेर येत नाही, तसा हरिपाठात रंगलेला नामधारक तेथेच गुंतून स्थिर राहातो. श्री ज्ञानदेवमहाराज म्हणतात की हरिनामरूप मंत्रशास्त्राला यमसुद्धा भितो. तो नामधारकालाच नव्हे, तर त्याच्या कुळगोत्रालाही स्पर्श करीत नाही. कमळाच्या विवरण: आपल्याला अखंड सुख असावे, दु:ख क...

हरिपाठ

हा लेख हरिपाठ म्हणजे नेहमी ईश्वराचे नामस्मरण करण्यासाठी केलेली अभंग रचना होय. वारकरी संप्रदायामध्ये हरिपाठाला महत्त्वाचे स्थान आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, संत नामदेव आणि संत निवृत्तीनाथ यांनी हरिपाठाचे अभंग रचलेले आहेत. यामध्ये मुख्यत्वे संत ज्ञानेश्वर महाराज कृत हरिपाठाचे अभंग जास्त गायले जातात. By हरिपाठासंबंधी अन्य पुस्तके [ ] • हरिपाठ - एक आनंदवाट (हरिपाठाचे विवेवन; लेखिका: डॉ. लता पाडेकर) • हरि मुखे म्हणा (हरिपाठाचे विवेवन; लेखिका: • श्रीज्ञानेश्वरकृत हरिपाठावर श्री अण्णा घाणेकर यांचे रसाळ निरूपण • सार्थ श्री पंचरत्‍न हरिपाठ (लेखक विठ्ठल जि. नाडकर्णी) • ज्ञानेश्वरी विशेष चिंतन - हरिपाठ एक आव्हानात्मक सूत्र ग्रंथ (लेखक: न्यायाचार्य श्री. नामदेव महाराज शास्त्री) संदर्भ [ ]

Haripath lyrics in Marathi

In this lyrics article you can read Haripath lyrics in Marathi – श्री ज्ञानदेव हरिपाठ, with English Lyrics from category lyrics free. या पोस्टमध्ये तुम्हाला Haripath lyrics in Marathi – श्री ज्ञानदेव हरिपाठ, English Lyrics सोबत Haripath lyrics in Marathi – श्री ज्ञानदेव हरिपाठ ॥ श्री ज्ञानदेव हरिपाठ ॥ ॥ एक ॥ देवाचिये द्वारीं उभा क्षणभरी । तेणें मुक्ति चारी साधियेल्या ॥१॥ हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा।पुंण्याची गणना कोण् करी ॥२॥ असोनि संसारीं जिव्हे वेगु करी । वेदशास्त्र उभारी बाह्या सदा ॥३॥ ज्ञानदेव म्हणे व्यासाचिया खुणा । द्वारकेचा राणा पांडवांघरीं ॥४॥ ॥ दोन ॥ चहूं वेदीं जाण साहीशास्त्रीं कारण । अठराही पुराणें हरिसी गाती ॥१॥ मंथुनी नवनीता तैसें घे अनंता । वायां व्यर्थ कथा सांडी मार्गु ॥२॥ एक हरि आत्मा जीवशिव सम । वायां तू दुर्गमा न घाली मन ॥३॥ ज्ञानदेवा पाठ हरि हा वैकुंठ । भरला घनदाट हरि दिसे ॥४॥ ॥ तिन ॥ त्रिगुण असार निर्गुण हें सार । सारासार विचार हरिपाठ ॥१॥ सगुण निर्गुण गुणाचें अगुण । हरिवीणें मन व्यर्थ जाय ॥२॥ अव्यक्त निराकार नाहीं ज्या आकार । जेथुनि चराचर हरिसी भजें ॥३॥ ज्ञानदेवा ध्यानीं रामकृष्ण मनीं । अनंत जन्मांनी पुण्य होय ॥४॥ ॥ चार ॥ भावेंवीण भक्ति भक्तिविण मुक्ति । बळेंवीण् शक्ति बोलु नये ॥१॥ कैसेनि दैवत प्रसन्न त्वरित । उगा राहें निवांत शिणसी वायां ॥२॥ सायासें करिसी प्रपंच दिननिशीं । हरिसी न भजसी कवण्या गुणें ॥३॥ ज्ञानदेव म्हणें हरिजप करणें । तुटेल धरणें प्रपंचाचें ॥४॥ ॥ पाच ॥ योगयागविधि येणें नोहे सिद्धी । वायांचि उपाधि दंभ धर्म ॥१॥ भावेंविण देव न कळे नि:संदेह । गुरुविण अनुभव कैसा कळे ॥२॥ तपेंवीण दैवत दिधल्याविण प्राप्त । गुजेंविण हित कोण सांगे ॥३॥ ज्ञानदेव ...