महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना

  1. Farmer Loan Waive Scheme
  2. महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतर्गत रु. ५० हजारापर्यंत प्रोत्साहनपर लाभ योजना शासन निर्णय जारी !
  3. शेतकरी कर्जमुक्ती प्रोत्साहनपर योजना! पात्र शेतकऱ्यांनी 15 जूनपर्यंत आधार प्रमाणीकरण करावे
  4. Farmer Loan Waive 2023: ‘कर्जमुक्ती’च्या यादीत १२ हजार ९४२ शेतकरी
  5. Farmer Loan Scheme Waive List In Maharashtra In Marathi
  6. mjpsky karjmafi list 2022
  7. महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना; ४ तारखेला आधार प्रमाणीकरण शिबीराचे आयोजन


Download: महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना
Size: 69.42 MB

Farmer Loan Waive Scheme

Farmer Laon Waive Scheme : जिल्ह्यात महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत (Mahatma Jotirao Phule Farmers Loan Waive Scheme) अल्पमुदतीच्या कर्जाची नियमित परतफेड (Loan Repayment) करणाऱ्या नऊ हजार ३२१ शेतकऱ्यांना ३६ कोटी ५८ लाख रुपयांचा लाभ देण्यात आला आहे. उर्वरित ३० हजार शेतकऱ्यांना लवकरच या योजनेचा लाभ मिळणार असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) कार्यालयाकडून मिळाली. या योजनेत नांदेड जिल्ह्यातील ६२ हजार ५०४ पात्र शेतकऱ्यांची यादी बँकेने अपलोड केली आहे. यातील ३२ हजार ९०९ शेतकऱ्यांच्या विशिष्ट क्रमांकासह याद्या प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यापैकी ३० हजार ७२० शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केले आहे. तर २ हजार १७९ शेतकरी आधार प्रमाणीकरणाचे बाकी असल्याचे जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून सांगण्यात आहे. प्रोत्साहन योजनेमधील महत्त्वाच्या बाबी... या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी २०१७-२०१८, २०१८-२०१९, २०१९-२०२० या तीन आर्थिक वर्षापैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षामध्ये शेतकऱ्यांनी नियमित २०१७ २०१८ चे पीककर्ज ३० जून २०१८ पर्यंत पूर्णतः परतफेड करणे गरजेचे. २०१८, २०१९ या वर्षातील पीककर्ज ३० जून २०१९ पर्यंत पूर्णतः परतफेड करणे गरजेचे. २०१९, २०२० चे कर्ज ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत फेडलेले असणे गरजेचे आहे. प्रोत्साहन योजनेचा लाभ देताना एखाद्या शेतकऱ्याने अनेक बँकाकडून कर्ज घेतलेले असेल अशावेळी एक किंवा अनेक बँकाकडून घेतलेल्या अल्पमुदत पीककर्जाच्या परतफेडीची एकत्रित रक्कम विचारात घेऊन ५० हजार या कमाल मर्यादेत लाभ मिळणार आहे.

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतर्गत रु. ५० हजारापर्यंत प्रोत्साहनपर लाभ योजना शासन निर्णय जारी !

राज्यात एकूण १५३ लाख शेतकरी असून शेती व शेतीशी निगडीत कामांकरिता शेतकरी व्यापारी बँका आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांकडून कर्ज घेतात. सन २०१५-१६ ते २०१८-१९ या सलग चार वर्षात राज्यातील विविध भागात दुष्काळसदृश परिस्थती निर्माण झाल्यामुळे मोठया प्रमाणात ५० पैसेपेक्षा कमी पैसेवारी जाहिर करण्यात आली होती. तसेच, राज्याच्या काही भागात अवेळी पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले होते. या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यामुळे मागील काही वर्षात शेती निगडीत कर्जाची मुदतीत परतफेड होवू शकली नाही. परिणामी शेतकरी थकबाकीदार झाल्यामुळे कर्जाच्या दुष्टचक्रात अडकलेला आहे आणि त्यांना शेती कामांकरिता नव्याने पीक कर्ज घेण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत. उपरोक्त परिस्थिती विचारात घेता हिवाळी अधिवेशन २०१९ मध्ये शासनाने महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली होती. त्यानुसार याबाबत खालील शासन निर्णयातील संदर्भाधीन दिनांक २७.१२.२०१९ चा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत अल्पमुदतीच्या पीककर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना रु. ५० हजारापर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याची घोषणा सन २०२० च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात करण्यात आली होती. तथापी मार्च, २०२० पासून संपूर्ण देशात उद्भवलेल्या कोविड- १९ च्या पार्श्वभूमीवर राज्याची आर्थिक घडी विस्कटल्याने सदर आश्वासनाची पूर्तता करणे शक्य झाले नाही. तद्ननंतर सन २०२२ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अल्पमुदतीच्या पीककर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना रु. ५० हजारापर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी सन २०२२-२३ या वित्तीय वर्षात अर्थसंकल्पी...

शेतकरी कर्जमुक्ती प्रोत्साहनपर योजना! पात्र शेतकऱ्यांनी 15 जूनपर्यंत आधार प्रमाणीकरण करावे

Farmer Scheme : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती प्रोत्साहनपर योजनेतंर्गत पात्र शेतकऱ्यांनी १५ जूनपर्यंत आधार प्रमाणिकरणासाठी जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर, ई सेवा केंद्रावर किंवा बँक शाखेशी संपर्क करून तातडीने संपर्क साधून आधार प्रमाणीकरण पूर्ण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक फयाज मुलाणी यांनी केले आहे. (Farmers Debt Relief Scheme Eligible farmers should do Aadhaar authentication by June 15 nashik news) या योजनेअंतर्गत नियमीत पीककर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी सन २०१७-१८, सन २०१८-१९ आणि सन २०१९-२० हा कालावधी विचारात घेतलेला आहे. या तीन आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षात पीक कर्जाची उचल करून नियमीत परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना ५० हजार मर्यादेपर्यंत या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. या योजनेसाठी नाशिक जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँका, खासगी बँका व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी पात्र त्यापैकी या योजनेस पात्र १ हजार ५२६ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण अद्यापही झालेले नाही. यासाठी पात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरणासाठी जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर, ई सेवा केंद्र किंवा बँक शाखेशी तातडीने संपर्क करून आपले आधार प्रमाणीकरण १५ जूनपर्यंत पूर्ण करून घ्यावे. हेही वाचा : आधार प्रमाणीकरणा अभावी प्रोत्साहन योजनेच्या लाभापासून कोणताही शेतकरी वंचित राहणार नाही, यासाठी हे आवाहन करण्यात येत आहे. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ या योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ या कालावधीत उचल केलेल्या एक किंवा एकापेक्षा जास्त कर्ज खात्यात अल्प मुदत पीक कर्जाची ३० सप्टेंबर २०१९ रोजी मुद्दल व व्याजासह थकीत असलेली व ...

Farmer Loan Waive 2023: ‘कर्जमुक्ती’च्या यादीत १२ हजार ९४२ शेतकरी

शेतीशी निगडित कामांसाठी शेतकरी व व्यापारी बँका आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांकडून शेतकरी कर्ज घेतात. २०१५-१६ ते २०१८-१९ या सलग चार वर्षात राज्यातील विविध भागांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात ५० पैशांपेक्षा कमी पैसेवारी जाहीर करण्यात आलती. राज्याच्या काही भागांत अवेळी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालते. त्यामुळे मागील काही वर्षांत शेती निगडित कर्जाची परतफेड होऊ शकली नाही. हे पण वाचा: PM Svanidhi Yojana: अडीच हजार लाभार्थ्यांना कर्जवाटप; तिसऱ्या टप्प्यातील कर्जासाठी अर्ज करा परिणामी, शेतकरी कर्जबाकीदार झाल्यामुळे कर्जाच्या दुष्टचक्रात अडकला होता. त्यामुळे त्यांना नव्याने पीककर्ज घेण्यास काही अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्या शेतकऱ्यांना २०१९ मध्ये महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना लागू करण्यात आली; पण अशा परिस्थितीत अनेक शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड नियमित केली होती. अशा शेतकऱ्यांना लाभ मिळाला नाही. | Farmer Loan Waive 2023 त्यामुळे नियमित कर्जफेड परत केलेल्या शेतकऱ्यांना शासनाने ५० हजार रुपयांची प्रोत्साहन अनुदान देणारी महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत प्रोत्साहनपर अनुदान लाभ देणारी योजना लागू केली. शेतकरी हा केंद्रबिंदू मानून ही योजना अमलात आणली आणि नियमित परतफेड केलेले कर्ज प्रोत्साहन अनुदान असलेल्या ५० हजारांपेक्षा कमी रकमेचे असल्यास त्यांनी उचल करून परतफेड केलेल्या रकमे एवढी रक्कम प्रोत्साहन अनुदान म्हणून देण्याचे जाहीर केले. प्रोत्साहन अनुदान लाभ योजनेची पहिली यादी जाहीर होऊन महिना संपला; मात्र शासनाने अद्याप दुसरी यादी जाहीर केली नाही. प्रोत्साहन लाभ मिळावा, यासाठी जिल्ह्यातील २३ हज...

Farmer Loan Scheme Waive List In Maharashtra In Marathi

Farmer Loan Scheme Waive List In Maharashtra In Marathi शेतकरी मित्रहो महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना (Farmer Loan Waive) प्रोत्साहन पर लाभ योजनेतील पहिल्या यादीत( Farmer Incentive Scheme ) रत्नागिरी जिल्ह्यातील १२ हजार ९४२ शेतकऱ्यांचा समावेश झालेला होता . या यादी मधील १२ हजार ८८० शेतकऱ्यांना न चुकता लाभ मिळाला आहे ; ६२ शेतकऱ्यांनी आपले आधार प्रमाणीकरण (Aadhar Verification )केलेले नसल्यामुळे पहिली यादी शंभर टक्के लाभ मिळण्यापासून वंचित राहिली . दुसरी यादी जाहीर न झाल्याने कर्जमुक्ती लाभासाठी अर्ज दाखल केलेले १० हजार शेतकरी प्रतीक्षेत आहेत . शेतकरी व व्यापारी बँका आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका शेती व शेतीशी निगडित कामाकरीता कर्ज घेत असतात . वर्षा २०१५ – २०१६ ते २०१८-१९ या सलग चार वर्षात राज्यातील विविध भागात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असल्यामुळे मोठ्या प्रमाणात ५० पैशांपेक्षा कमी पैसेवाही जाहीर केली होती. राज्यातील काही भागात वेळी पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते . यामुळे मागील काही वर्षात शेतकरी शेती निगडित कर्जाची परतफेड करू शकले नव्हते त्यामुळे , शेतकरी हा कर्जाच्या दृष्टचक्रात अडकला होता . परिणामी शेतकऱ्यांना नव्याने पीक कर्ज घेण्यास अडचणी निर्माण होत होत्या . अशा शेतकऱ्यांना 2019 पासून महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना लागू करण्यात आली होती . कर्जमाफी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा .

mjpsky karjmafi list 2022

ही योजना राबवत असताना 27 जुलै 2022 नुसार या योजनेची अंमलबजावणी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना (mjpsky karjmafi list 2022) च्या पोर्टलच्या माध्यमातून ज्या प्रमाणे करण्यात आली त्याच प्रमाणे करण्यात येईल अशी माहिती देण्यात आलेली आहे. त्यामुळे हे 50 हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान वितरीत करत असताना सुद्धा तीच प्रक्रिया पार पाडली जाईल, अशा प्रकारची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 चे mjpsky.maharashtra.gov.in या पोर्टल वर याद्या प्रकाशित होतील. यावर काही अपडेट आलं तर ते आपण पाहणारच आहोत. परंतु तोपर्यंत आपण ज्या बँकेचे ग्राहक आहात त्या ठिकाणी जाऊन तसेच सोसायटीच्या माध्यमातून कर्ज परतफेड करत असला तर त्याठिकाणी जाणून संपर्क साधावा अन् आपलं नाव यादीत आहे की नाही ते पाहावं. आणि हे अनुदान 15 सप्टेंबर म्हणजे उद्या गुरुवारपासून खात्यावर क्रेडिट व्हायला सुरुवात होणार आहे.

महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना; ४ तारखेला आधार प्रमाणीकरण शिबीराचे आयोजन

अकोला –महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी सुरु असुन या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील १९८६ खातेदारांचे अद्यापही आधार प्रमाणिकरण झालेले नाही. अशा पात्र लाभार्थ्यांना अखेरची संधी म्हणून सोमवार दि.४ रोजी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचे सहाय्यक निबंधक एस. डब्ल्यू. खाडे यांनी दिली आहे. यासंदर्भात दिलेल्या माहिती पत्रकात म्हटले आहे की, महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने अंतर्गत दि. १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ या कालावधीमध्ये कर्ज घेतलेल्या व दि. ३० सप्टेंबर २०१९ पर्यत व्याजासह दोन लाखापर्यंत थकित कर्जाची रक्कम संबधीत पात्र शेतकऱ्याच्या कर्जखात्यावर शासनामार्फत वर्ग करण्यात येते. या योजनेअंतर्गत संबधीत बॅंकांनी कर्जमुक्ती योजनेच्या पोर्टलवर शेतकऱ्यांचा डाटा भरलेला असून त्यांची छाननी करुन पात्र शेतकऱ्याच्या याद्या पोर्टलवर उपलब्ध आहेत. ज्या शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण करणे शिल्लक आहे अशा पात्र लाभार्थ्यांसाठी सोमवार दि. ४ रोजी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. आधार प्रमाणीकरण न झालेल्या शेतकऱ्यांनी या शिबीराचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थाचे सहाय्यक निबंधक(प्रशासन) एस. डब्ल्यू. खाडे यांनी केले आहे. महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळण्यासाठी लाभार्थी यादीतील शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करणे बंधनकारक आहे. आधार प्रमाणीकरण झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात रक्कम जमा होण्याची कार्यवाही सुरु होते. आधार प्रमाणीकरण करताना पोर्टलवरील माहितीचे काळजीपूर्वक अवलोकन करुन आधार क्रमांक व लाभाची रक्कम याची तपासणी करावी. बॅंकेने भरलेल्या पोर्टलवरील माहितीत आधार क्रमांक किंवा रक्कम चुक...