Sant namdev abhang

  1. संत शिरोमणी नामदेव महाराज
  2. संत नामदेव गाथा गवळण


Download: Sant namdev abhang
Size: 27.66 MB

संत शिरोमणी नामदेव महाराज

ह्यांचा जन्म प्रभव नाम संवत्सरात, शके 1192 (इ.स.1270)मध्ये कार्तिक शुद्ध एकादशीला, रोहिणी नक्षत्रास, रविवारी हिंगोली जिल्ह्यातील नरसी- बामणी (नरसी नामदेव) गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव दामाशेटी आणि आईचे नाव गोणाई असे. ह्यांचे आडनाव रेळेकर होते. त्यांचे वडील शिंपी होते, ते कापडं शिवण्याचा व्यवसाय करीत होते. संत गोरा कुंभार यांच्याकडे तेरढोकी येथे निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर महाराज, सोपानदेव, मुक्ताबाई, संत नामदेव, चोखामेळा, विसोबा खेचर या संतांचा मेळा जमला असतांना संत ज्ञानेश्वरांच्या विनवणीला मान देऊन गोरोबाकाकांनी सर्वां बद्दल आध्यात्मिक तयारी विषयीचे आपले मत मांडले. या प्रसंगानंतरच संत नामदेवांना विसोबा खेचर हे गुरु म्हणून लाभले. त्यांच्यासंबंधी काही आख्यायिका अश्या आहेत की ते लहान असतांना त्यांचा वडिलांनी त्यांना सांगितले की 'आज देवाला आपण नैवेद्य दाखवावे. त्या दिवशी नामदेवाने नुसतं नैवेद्यच दाखविले नाही तर तिथेच वाट बघत राहिले की देव हे नैवेद्य कधी खाणार. त्यांचा निरागस अपेक्षेला मान देऊन प्रत्यक्ष विठ्ठल त्यांचा समोर प्रकट होऊन नामदेवांनी दिलेल्या प्रसादाचे(खीरीचे) भक्षण केले. महाशिवरात्री निमित्ते संत नामदेव औंढा नागनाथाच्या दर्शनासाठी गेले असता त्यांना भजन कीर्तन न करण्यास पुजाऱ्याने विनवणी केली. त्यांचा विनंतीला मान देऊन नामदेव देऊळाच्या बाजूस बसून नागनाथाला आळवू लागले, त्यांचा भक्तीला बघून त्यांना दर्शन देण्यासाठी देवाने पूर्वाभिमुख केलेले देऊळ फिरवून पश्चिमाभिमुख केले. ते आजतागायत तसेच आहे. भागवत धर्माचे एक आद्य प्रचारक म्हणून त्यांनी 50 वर्षे भागवत धर्माचा प्रचार केला. संत नामदेवांची अभंगगाथा (सुमारे 2500) अभंग प्रसिद्ध आहे. त्यांनी काही हिंदी भाषेत देखील काही अ...

संत नामदेव गाथा गवळण

संत नामदेव १. परब्रम्ह निष्काम तो हा गौळियां घरीं । वाक्या वाळे अंदु कृष्ण नवनीत चोरी ॥१॥ म्हणती गौळणी हरीचीं पाउलें धरा । रांगत रांगत येतो हरी हा राजमंदिरा ॥२॥ लपत छपत येतो हरी हा राजभुवनीं । नंदासी टाकूनि आपण बैसे सिंहासनीं ॥३॥ सांपडला देव्हारीं यासी बांधी दाव्यांनीं । शंख चक्र गदा पद्म शारंगपाणी ॥४॥ बहुता कष्टें बहुता पुण्यें जोडलें देवा । अनंत पवाडे तुमचे न कळती मावा ॥५॥ नामा म्हणे केशवा अहोजी तुम्ही दातारा । जन्मोजन्मीं द्यावी तुमची चरणसेवा ॥६॥ २. गेलिया वृंदावना तेथें देखिला कान्हा । संवगडिया माजी उभा ध्यान लागलें मना ॥१॥ हरिनाम गोड झालें काय सांगों गे माय । गोपाळ वाहती पावे मन कोठें न राहे ॥२॥ त्याचें मुख साजिरें वो कुंडलें चित्त चोरें । सांडुनी अमृत धनी लुब्धलीं चकोरें ॥३॥ सांडुनी ध्रुवमंडळ आली नक्षत्रमाळा । कौस्तुभा तळवटीं वैजयंती शोभे गळां ॥४॥ सांडुनी मेघराजु कटिसूत्नीं तळपे विजू । भुलला चतुराननू तया नव्हे उमजू ॥५॥ सांडुनी लक्ष्मी निज गोपाळासी बोले गुज । अचोज हा चोजवेना ब्रम्हांदिकां सहज ॥६॥ वांजट धीट मोठी ऐसी कवण असे खिळू । भेदली हरिचरणीं पायीं मुरडीव वांकी सोज्वळू ॥७॥ त्याचें पायींची नेपुरें वाजती वो गंभीरें । लुब्धलीया पक्षयाती धेनु पाचारी स्वरें ॥८॥ आणिक एक नवल कैसें स्वर्गीं देव झाले पिसे । ब्रम्हादिक उच्छिष्ठालागीं देखा जळीं झाले मासें ॥९॥ आणिक एक नवल परी करीं घेऊनि शिदोरी । सवंगडया वांटितसे नामया स्वामी मुरारी ॥१०॥ ३. यशोदे घराकडे चाल मला जेवूं घाल ॥धु०॥ साध्या गव्हांची पोळी लाटीं । मला पुरण पोळी करून दे मोठी । नाहीं अडवीत गुळासाठीं । मला जेवूं घाल ॥१॥ तूप लावून भाकर करीं । वांगें भाजून भरीत करीं । वर कांद्याची कोशिंबिरी । मला जेवूं घाल ॥२॥ आईग खडे साखरेचे...