शासन आपल्या दारी

  1. Ratnagiri Eknath Shinde Maharashtra Govt Launches Shasan Aplya Dari Initiative To Bring Government Schemes And Services To Citizens Doorsteps
  2. ‘शासन आपल्या दारी’ ला भोसरीमध्ये मुदतवाढ आता मिळणार घरपोच दाखले
  3. ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमासाठी एसटीच्या ३५३ गाड्या
  4. Shasan Aplya Dari What Did CM Eknath Shinde Say About The Development Of Kolhapur
  5. 'शासन आपल्या दारी' योजनांची भाजप आमदारांकडूनच पोलखोल; जालन्यातील प्रकाराने खळबळ


Download: शासन आपल्या दारी
Size: 47.6 MB

Ratnagiri Eknath Shinde Maharashtra Govt Launches Shasan Aplya Dari Initiative To Bring Government Schemes And Services To Citizens Doorsteps

रत्नागिरी: 'सरकारी काम आणि सहा महिने थांब' हे चित्र बदलणार असून आम्ही 24 तास काम करतोय असं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी म्हटलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यात 'शासन आपल्या दारी' (Shasan Aplya Dari) या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे वक्तव्य केलं. या निमित्तानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रत्नागिरीत विविध शासकीय योजनेतल्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर एकनाथ शिंदे यांचा हा तिसरा रत्नागिरी दौरा होता. रत्नागिरीतल्या प्रमोद महाजन क्रीडा संकुलात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 'शासन आपल्या दारी' या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी विविध शासकीय योजनेतील लाभार्थ्यांशी संवाद साधला. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांना प्रमाणपत्रंही देण्यात आली. सरकारी काम आणि सहा महिने थांब हे चित्र आता बदलणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री शिंदेंनी उपस्थितांना दिला. आम्ही 24 तास काम करणारे कार्यकर्ते आहोत, मुख्यमंत्री असलो तरी मी कार्यकर्ता म्हणूनच काम करतोय, असं सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदीही आपल्याला मदत करत असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आवर्जून सांगितलं. शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी रत्नागिरीतल्या नऊ तालुक्यांमधून दहा हजारापेक्षा जास्त लाभार्थी उपस्थित होते. नागरिकांना सरकारी योजना आणि कागदपत्रे एकाच ठिकाणी सहज उपलब्ध करून देणे हा शासन आपल्या दारी या उपक्रमाचा प्राथमिक उद्देश आहे. यासाठी सुमारे 75,000 स्थानिकांना लाभ वाटप करण्यासाठी जिल्हा प्रशासनांना त्यांच्या संबंधित भागात दोन दिवसीय शिबिरे आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शासन आपल्या दारी या योजनेच्या म...

‘शासन आपल्या दारी’ ला भोसरीमध्ये मुदतवाढ आता मिळणार घरपोच दाखले

पिंपरी, ता. १४ : भोसरी विधानसभा मतदार संघात प्रशासनाच्यावतीने राबवलेल्या ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. अवघ्या १५ दिवसांमध्ये सुमारे ९ हजाराहून अधिक अर्ज दाखल झाले आहेत. राज्य शासनाच्या निर्देशानुसार ३० ऑगस्टपर्यंत या उपक्रमाला मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृह येथे १५ जून रोजी नियोजित केलेल्या कार्यक्रमाला स्थगिती देण्यात येत आहे, अशी माहिती पिंपरी-चिंचवडच्या तहसीलदार डॉ. अर्चना निकम यांनी दिली. राज्य सरकारने ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम हाती घेतला आहे. त्या माध्यमातून विधानसभा मतदार संघनिहाय दाखले वाटप कार्यक्रम घेण्यात येत आहेत. भोसरी विधानसभा मतदार संघात १ जून २०२३ ते १५ जून २०२३ या कालावधीत हा उपक्रम राबवण्याचे नियोजित आहे. भोसरी विधानसभा मतदार संघामध्ये गेल्या १५ दिवसांपासून ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम राबवला जात आहे. त्याला राज्य शासनाकडून मुदतवाढ मिळाली आहे. १५ जून २०२३ रोजी भोसरीतील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृह या ठिकाणी नियोजित दाखले वाटप कार्यक्रम स्थगित केला आहे. संबंधित लाभार्थींना पुढील १५ दिवसांमध्ये दाखल्यांचे वाटप घरपोच करण्यात येणार आहे. - डॉ. अर्चना निकम, तहसीलदार, पिंपरी-चिंचवड.

‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमासाठी एसटीच्या ३५३ गाड्या

रत्नागिरी : शासकीय विविध कल्याणकारी योजनांचा सर्वसामान्याना लाभ मिळावा यासाठी रत्नागिरीत ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाचे आयोजन गुरूवारी (२५ मे) करण्यात आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थित होणाऱ्या कार्यक्रमासाठी जिल्हाभरातून लाभार्थींना आणण्यासाठी एसटीच्या ३५३ गाडयांचे आरक्षण करण्यात आले होते. शासन आपल्या दारी योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला लवकरात लवकर योजनांचा लाभ मिळावा हे प्रमुख उद्दिष्ट असून जिल्ह्यात आतापर्यंत ९० हजार जणांपैकी ५२ हजार जणांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. गुरूवारी (२५ मे) एकूण २५ हजार जणांना लाभ देण्यात आला. आपले सरकार कार्यक्रमासाठी जिल्हा प्रशासनाकडून नियोजन करण्यात आले होते. प्रमोद महाजन क्रीडा संकुल येथे आयोजित कार्यक्रमासाठी जिल्हाभरातून लाभार्थींना आणण्यासाठी एसटीची व्यवस्था करण्यात आली होती. मंडणगड तालुक्यातून २०, दापोली २५, खेड ४०, चिपळूण ५०, देवरूख ५०, रत्नागिरी ६०, गुहागर ३०, लांजा १८, राजापूर तालुक्यातून ६० मिळून एकूण ३५३ एसटीच्या गाड्या प्रशासनाकडून आरक्षित करण्यात आल्या होत्या. प्रत्येक तालुक्यातून लाभार्थींना रत्नागिरी आणून प्रमोद महाजन क्रीडा संकुल येथे सोडण्यात आले. त्यानंतर सर्व गाड्या चंपक मैदान येथे तात्पुरते वाहन तळ तयार करून तेथे लावण्यात आल्या होत्या. कार्यक्रम संपल्यानंतर पुन्हा प्रमोद महाजन क्रीडा संकुल येथून त्या त्या तालुक्यातील लाभार्थींना घेवून रवाना होणार आहेत. शासनाच्या या उपक्रमामुळे एसटीच्या उत्पन्नात ५० ते ६० लाखाची भर पडणार आहे. Web Title: 353 trains of ST for 'Sasan Apya Dari' programme Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertain...

Shasan Aplya Dari What Did CM Eknath Shinde Say About The Development Of Kolhapur

Eknath Shinde in Kolhapur: शासन आपल्या दारी; कोल्हापूरच्या विकासाच्या मुद्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले? कोल्हापूरकरांची अनेक वर्षापासूनची मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठ मागणी पूर्ततेसाठी लवकरच मा. उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना भेटून विनंती करणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. Eknath Shinde in Kolhapur: कोल्हापूरची जनता विकासांच्या मुद्यांवर आग्रही असते. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासाचे सर्व प्रश्न मार्गी लावणार आहे. गेल्या दहा-अकरा महिन्यात शासनाने विविध विकास कामांसाठी जिल्ह्याला 762 कोटीचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. कोल्हापूरकरांची अनेक वर्षापासूनची मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठ मगणी पूर्ततेसाठी लवकरच मा. उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना भेटून विनंती करणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. पंचगंगा प्रदूषण मुक्त केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. तपोवन मैदानात ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी त्यांच्या हस्ते शासन योजनांचा लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरुपात प्रमाणपत्र देण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, करवीर निवासनी अंबाबाई मंदीराच्या विकासाला प्राधान्य देण्यात आले आहे. भारत दर्शन अंतर्गत तीर्थ क्षेत्र पर्यटन परिक्रमासाठी सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. सरकारी काम आणि सहा महिने थांब हा पायंडा खोडून काढण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा गतीमान करण्यात आली आहे. सर्व योजनांचा लाभ तळागाळापर्यंत पोहचविण्यासाठी प्रशासन दुत म्हणून काम करीत आहे. योजनांच्या लाभ घेण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांच्या पूर्ततेसाठीही सर्व स...

'शासन आपल्या दारी' योजनांची भाजप आमदारांकडूनच पोलखोल; जालन्यातील प्रकाराने खळबळ

जालना, 19 मे : सर्वसामान्यांची कामे स्थानिक पातळीवर व्हावीत, त्यांना विविध योजनांचे लाभ मिळावेत यासाठी शासन जनतेच्या दारी जाणार आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून राज्यात ‘शासन आपल्या दारी’ हे अभियान मोठ्या दिमाखात सुरू करण्यात आलं आहे. या अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ 13 मे रोजी सातारा जिल्ह्यातील दौलतनगर (ता.पाटण) येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला आहे. मात्र, या योजनेची पोलखोल भाजप आमदारानेच केल्याने खळबळ उडाली आहे. अंबडमध्ये शासन आपल्या दारी योजना कार्यक्रमात पैसे घेतल्याचा आरोप भाजप आमदाराने केला आहे. काय आहे प्रकरण? शासन आपल्या दारी या कार्यक्रमाची भाजप आमदार नारायण कुचे यांच्याकडून पोलखोल करण्यात आली आहे. जालना जिल्ह्यातल्या अंबडमध्ये आज शासन आपलया दारी योजनेचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी कामगार कल्याण विभाकडून कीट घेण्यासाठी महिलांनी मोठी गर्दी केली होती. या कार्यक्रमाला भाजप आमदार नारायण कुचे यांचीही प्रमुख उपस्थिती होती. मात्र, एका कीटसाठी महिलांकडून फॉर्मसाठी सातशे रुपये तर कीटचे दीड हजार रुपये घेतले असल्याचं महिलांनी कुचे यांच्यासमोर सांगितलं. दरम्यान आमदार कुचे यांनी या संपूर्ण घोटाळ्याची शासन आपल्या दारी या कार्यक्रमातचं पोलखोल केल्याने कामगार कल्याण विभागाच्या कर्मचाऱ्यात एकच खळबळ उडाली असून चौकशी करण्याची मागणी केली आहे. वाचा - काय आहे योजना? राज्यात ‘शासन आपल्या दारी’ अभियानांतर्गत नागरिकांना विविध शासकीय योजनांचे लाभ आणि विविध महत्त्वाची कागदपत्रे एकाच ठिकाणी मिळणार आहेत. राज्यभर या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी मुख्यमंत्री सचिवालयात जनकल्याण कक्ष सुरू करण्यात आला आहे. या कक्षामार्फत राज्यातील अभियानाचे समन्वयन करण्यात येण...